राज्यात सोमवारी नवीन ४७ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण २५०, बळींचा आकडा १० वर
मुंबई - महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे ४७ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २५० वर गेली आहे. मुंबईत ३८, पुणे ५, नागपुरात २ व नाशिक, कोल्हापूर येथील प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या ३९ जणांना आतापर्यंत घरी पाठवण्यात आले आहे. सोमवारी आणखी दोन र…