मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता देशातील कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू बनले आहे. आज (मंगळवार 31 मार्च) रोजी येथे संसर्गाचे 72 प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईतील संक्रमितांची संख्या आता 164 वर पोहोचली आहे. देशातील एखाद्या शहरात संक्रमित होण्याचा हा सर्वाधिक आकडा आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 302 झाली आहे. तर राज्यात कोरोणामुळे राज्यात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील आठ जण मुंबईतील आहेत. संसर्गाचे अधिक प्रकरणे मुंबईतील कोळीवाड्यात आढळले आहेत. यानंतर कोळीवाडा सील करण्यात आला आहे. तज्ज्ञांनी मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका वर्तवला आहे. मुंबईत आढळलेल्या बहुतांश रुग्णांचा प्रवास इतिहास नाहीये.

कोरोना व्हायरस प्रभावित क्षेत्रांचे जीआयएस मॅपिंग
बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी)ने शहरात कोरोना व्हायरसने प्रभावित भागांची जीआयएस मॅपिंग सुरू केली आहे. संसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी वॉर रूमही तयार केली गेली आहे. बीएमसीचे आयुक्त प्रविण परदेसी यांनी सांगितले की, ज्या भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे, त्यांचा जीपीएस मॅपिंग करून बीएमसीच्या वेबसाइटवर अपलोड केली जाणार आहे. जेणेकरून लोकांना याबाबत माहिती मिळेल आणि ते त्या भागात जाणार नाहीत. ते म्हणाले की, यामुळे संसर्गग्रस्त भागात राहणाऱ्या रहिवाशांना अधिक जागरूक राहण्यास आणि अधिक सावधगि
